Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महाराष्ट्र प्रदेश असंघटीत कामगार काँग्रेसचे विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । कोरोनामुळे केलेल्या लॉकडाऊनच्या काळात पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्र शासनाने न्यायासाठी क्षेत्रीय स्तरावर पथ विक्रेता समिती गठीत करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश असंघटीत कामगार काँग्रेसचे जळगाव जिल्हाध्यक्ष गणेश बारसे यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नगरपथ विक्रेता नागरी अर्थव्यवस्थेचा अत्यंत महत्वाचा घटक असून नगरवासियांना विविध स्वस्त दरात वस्तू व उपलब्ध सुनिश्चत करण्यात महत्वपुर्ण भूमिका बजावतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाकेबंदी केल्यामुळे पथविक्रेत्यांवर उपजिविकेवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यांच्याकडे पथविक्रीसाठी भांडवल शिल्लक नसल्याने पुन्हा व्यवसाय सुरू करणे कठीण झाले आहे. याकरीता त्यांच्या व्यवसाय उभा करण्यासाठी केंद्र शासनाने योजनेंतर्गत अंमलबजावणी करण्यासाठी व न्यायासाठी क्षेत्रीय आणि नगर स्तराव पथ विक्रेता समिती गठीत करण्यात यावी अशी मागणी केली. तसेच असंघटीत कामारांचे पाच महिन्याचे विजबिल माफ करण्यात यावे, लॉकडाऊन काळात वकिलांवर होणारी उपासमारीची वेळ आली आहे. त्यांनाही आर्थीक मदत मिळावी अशीही मागणी केली.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश असंघटीत कामगार काँग्रेसचे जळगाव जिल्हाध्यक्ष गणेश बारसे, ज्येष्ठ नेते योगेंद्रसिह पाटील, ॲड. शरदराव तायडे, ॲड. रम्मु अ.रहिम, ताहेर पटेल, जावेद अहमद, तसलीम पेहलवान, निजाम शेख, प्रल्हाद सोनवणे, सुनिल वाणी, मनपा कामागार संघाचे जिल्हाध्यक्ष पी.जी.पाटील, विजय वाणी, योगीता शुक्ल, महिला जिल्हा समन्वय छायाबाई कोळी, अमिनाबाई तडवी, सुदाम कारडे आदींची उपस्थिती होती.

 

Exit mobile version