Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महाराष्ट्र पत्रकार संघाच्या औरंगाबाद जिल्हाध्यक्षपदी आकाश महालपूरे

 

पाचोरा, प्रतिनिधी । महाराष्ट्र पत्रकार संघाच्या प्रदेशाध्यक्ष विलासराव कोळेकर यांच्या अध्यक्षतेखाली औरंगाबाद जिल्हाध्यक्षपदी पत्रकार आकाश दिपक महालपूरे यांची नुकतीच निवड करण्यात आली.

महाराष्ट्र पत्रकार संघ राज्यातील सर्वाधिक पत्रकार सभासद असलेला पत्रकार संघ आहे. पत्रकारांच्या न्याय व हक्कासह सामाजिक उन्नतीसाठी सदैव कटिबद्ध असलेला संघ म्हणून महाराष्ट्र पत्रकार संघाने ओळख निर्माण केली आहे. राज्यातील प्रत्येक शहरात – खेड्यात पत्रकार संघाचे काम पोहचले आहे. हे काम अविरतपणे सुरू राहावे म्हणून व औरंगाबाद जिल्ह्याच्या काही दुर्गम भागात पत्रकार संघाच्या माध्यमातून कामे व्हावीत. म्हणून पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष विलासराव कोळेकर, राज्य संघटक शिरीष कुलकर्णी, प्रशांत लाड, सोमनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाने आकाश महालपूरे यांची निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

Exit mobile version