Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने स्वच्छता मोहिमेस प्रारंभ

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | भारताच्या ७५  वा स्वतंत्र दिनाच्यानिमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेना, जळगाव शहर कडून तीन दिवस शहरात स्वच्छता मोहीमेचा शुभारंग आजपासून काव्यरत्नावली चौकातून करण्यात आली.

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, जळगाव शहरच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने दि. १३ ते १५ ऑगस्ट तीन दिवशीय शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेसं आज शनिवार दि. १३ ऑगस्ट पासून काव्यरत्नावली चौक येथे स्वच्छता करून सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे, मनसे शहराध्यक्ष आशिष सपकाळे, मनेस शहराध्यक्ष विनोद शिंदे, मनसे जिल्हा संघटक राजेन्द्र निकम, राजू डोंगरे, संजय पाटील,  प्रशांत बाविस्कर,  दिपक राठोड, राहुल चव्हाण, राहुल दाभाडे ,हरी ओम सूर्यवंशी, खुशाल ठाकूर,निलेश वाणी, किरण सपकाळे, प्रणव चव्हाण, लोकेश वडनेरे,  प्रशांत उमडकर, सुमित राठोड , तसचं मनसे चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Exit mobile version