Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महाराष्ट्र दिनी औरंगाबाद येथ जाहीर सभा घेणार – राज ठाकरे

पुणे, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा | महाराष्ट्र दिनी अर्थात १ मे रोजी मी औरंगाबाद येथे जाहीर सभा घेणार आहे. त्यानंतर ५ मे रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

मशिदींवरील भोंग्यांचा सर्वाना त्रास होत असतो. हा धार्मिक नव्हे तर सामाजिक विषय आहे. या भोग्यांचा त्रास केवळ हिंदुना होतो नसून तो सर्वाना होत असतो. त्यामुळे जर ३ मेपर्यंत मशिदींवरील भोंगे काढले नाही तर देशभरातील हिंदू बांधवांनी जशास तसे उत्तर देण्यास तयार रहाव असे आवाहन केले आहे. आम्हाला देशात कोणत्याही स्वरूपाच्या दंगली नको आहेत. शांततेत भोंगे काढून घ्या अन्यथा आम्ही दिवसातून पाच वेळा मशिदीसमोर हनुमान चालिसा वाजवणार, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.

Exit mobile version