Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीची एक दिवसीय कार्यशाळा उत्साहात (व्हिडिओ)

जळगाव,प्रतिनिधी । महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीतर्फे प्रदेशाध्यक्ष सोमनाथ गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. 

 

अध्यक्षीय भाषणात गायक सोमनाथ गायकवाड यांनी  महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समिती स्थापन करण्यामागील भूमिका स्पष्ट करतांना सांगितले की, वाघ्या मुरळी, गोंधळी,पोतराज, शाहीर, तमाशा व इतर पारंपारिक कलावंत यांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्रात तालुका, शहर पातळीवर काम करणाऱ्या काही व्यक्ती  माझ्या संघटनेत या आणि सर्टिफिकेट घ्या अशी आमिष दाखवून यातून लुटमार करत आहे. या लुटमारिला आळा घालण्यासाठी संघटनेची बांधणी करण्यात आली असल्याचे श्री. गायकवाड यांनी स्पष्ट केले. 

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मस्टर सुजित औताने, लोकशाहीर प्रेमसागर कांबळे, उत्तमराव अंबीलढगे, देवराम हरणे, विनोद ढगे, बबनभाई शेख, नवनाथ शिंदे आदी उपस्थित होते. कार्यशाळेत राज्यातील प्रत्येक जिल्हातील प्रमुख सहभागी झाले होते. त्यांनी जिल्हा पातळीवर संघटन बांधणी करतांना येणाऱ्या अडचणी, कलावंताचा प्रतिसाद याबाबत मनोगत व्यक्त केले. प्रास्तविक  महासचिव गणेश अमृतकर यांनी केले.

 

 

 

Exit mobile version