Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महाराष्ट्र अंनिसच्या शहर कार्याध्यक्षपदी जितेंद्र धनगर यांची फेरनिवड

 

जळगाव, प्रतिनिधी ।   येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा जळगाव शहरची २०२१ या वर्षासाठी कार्यकारिणी नुकतीच एका ऑनलाईन बैठकीत जाहीर करण्यात आली. शहर कार्याध्यक्षपदी जितेंद्र धनगर तर कार्यवाहपदी कल्पना चौधरी यांची फेरनिवड झाली. या बैठकीत आगामी विविध उपक्रमाविषयी नियोजन करण्यात आले.

बैठकीत शाखेची सद्यस्थितीबाबत शहर कार्याध्यक्ष जितेंद्र धनगर यांनी माहिती दिली. यानंतर शाखेची या वर्षाची कार्यकारिणी निरीक्षक तथा जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डी.एस. कट्यारे यांनी एकमताने चर्चा करून घोषित केली. यात जळगाव शहर शाखेचे नवनियुक्त अध्यक्ष म्हणून प्रा.दिलीप भारंबे, उपाध्यक्ष सुरेखा राजेंद्र चौधरी यांच्यासह शहर कार्याध्यक्ष जितेंद्र धनगर, प्रधान सचिव कल्पना शिरीष चौधरी, कायदेशीर सल्लागार ऍड. कुणाल बि-हाडे, विविध उपक्रम कार्यवाह मीनाक्षी विश्वजीत चौधरी, वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प रियाज शाह, बुवाबाजी संघर्ष गुरुप्रसाद पाटील यांची निवड करुन जाहीर करण्यात आली.
नवनिर्वाचित सदस्यांनी आपलं मनोगत व्यक्त केले. समारोप व आभार जिल्हा प्रधान सचिव रविंद्र चौधरी यांनी केले. प्रसंगी शिरीष चौधरी, विश्वजीत चौधरी, दिनेश पाटील आदी उपस्थित होते.

Exit mobile version