Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महाराष्ट्रात आगामी सर्वच निवडणुकीत भाजपाची ताकद पहायला मिळेल

 नागपूर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी – गोव्याच्या विधानसभा विजयाचे शिल्पकार ठरलेले विधानसभेचे विरोधीपक्ष नेते ना.देवेन्द्र फडणवीस यांचे नागपुरात उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी विरोधीपक्ष नेते फडणवीस बोलत होते.

गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपाने विजय मिळवला, त्यानंतर विरोधीपक्ष नेते ना.देवेन्द्र फडणवीस नागपुरात आले. यावेळी फडणवीस यांच्या स्वागतासाठी विमानतळाबाहेर कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावत विजयासाठी शुभेच्छा दिल्या. दरम्यान नागपूर विमानतळ ते केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या घरापर्यंत रॅली काढण्यात आली

यावेळी महाराष्ट्रात २०२४ ला पूर्ण बहुमताचं भाजपा सरकार पहायला मिळेल असा विश्वास व्यक्त करीत “गोवा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूरमध्ये मिळालेला विजय आहे. महाराष्ट्रातही तीच स्थिती आहे, ‘ मोदींच्या कामाला लोकांनी दिलेली पावती असून मोदींच्या आणि टीम गोव्याच्या वतीने सत्कार, स्वागत मी स्वीकारत असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.

तसेच जी संधी मिळाली त्याचं सोनं करण्याचा मी प्रयत्न केला. हे आपल्या लोकांनी दिलेलं प्रेम असून मोदींच्या कामाला दिलेली पोचपावती आहे. त्याबद्दल मी आभारी आहे. ‘राजकारणात काहीही होऊ शकतं. पण मी काही म्हटले की लगेच सरकार पडणार अशा चर्चा सुरु होतात, याच्यात मला रस नाही. महाराष्ट्रात भाजपाचेच पूर्ण बहुमताचं सरकार मी आणणार, असे यावेळी त्यांनी सांगितले.

‘ज्यावेळी महाराष्ट्रात निवडणुका होतील, तेव्हा भाजपा नंबर १ राहील आणि भाजपा आपल्या विश्वासावर पूर्ण बहुमताने सरकार आणणार, असेहि फडणवीसांनी सांगितले.

 

Exit mobile version