Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महाराष्ट्रातील कोरोनाचा नवा स्ट्रेन जास्त घातक

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । महाराष्ट्रात आढळून आलेल्या कोरोनाच्या नवा स्ट्रेनच्या संसर्गाचा वेग प्रचंड असून, तो जास्त घातक ठरू शकतो, असा इशारा दिल्लीतील ‘एम्स’चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिला आहे

 

महाराष्ट्रात कोरोना पुन्हा एकदा थैमान घालण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काही दिवसांत प्रसार वाढला असून, रुग्णसंख्येचा वेगही वाढल्याचे आकडेवारीतून दिसत आहे. या संकटाबरोबर चिंता वाढवणारी एक बाब समोर आली आहे. देशात २४० नवीन स्ट्रेन आढळून आले आहेत.  या नवीन स्ट्रेनचा अॅण्टीबॉडीज तयार झालेल्या लोकांनाही संसर्ग होऊ शकतो, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

 

 

 

‘एम्स’चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी ही माहिती दिली. देशात २४० नवी स्ट्रेन आढळून आले असून, महाराष्ट्रात आढळून आलेला स्ट्रेन जास्त घातक ठरू शकतो, असं ते यावेळी म्हणाले. “भारतात हर्ड इम्युनिटी ही कल्पनाच ठरणार आहे. कारण देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी ८० टक्के लोकांमध्ये अॅण्टीबॉडीजची गरज आहे. महाराष्ट्रात आढळून आलेल्या नव्या स्ट्रेनचा विचार केल्यास हे अवघड दिसत आहे. कारण या स्ट्रेनच्या संसर्गाचा वेग प्रचंड असून, तो जास्त घातक ठरू शकतो. ज्या नागरिकांमध्ये अॅण्टीबॉडीज विकसित झालेल्या आहेत. त्यांनाही याचा संसर्ग होऊ शकतो,” इशारा डॉ. गुलेरिया यांनी दिला.

 

हर्ड इम्युनिटीबद्दल गुलेरिया म्हणाले,”म्युटेशन्समध्ये (विषाणूचं बदलेलं रुप) किंवा नवीन स्ट्रेनमध्ये प्रतिकार शक्तीपासून बचावाची क्षमता तयार झाली आहे. त्यामुळे लसीमुळे वा बऱ्या झालेल्या आणि अॅण्टीबॉडीज तयार झालेल्या माणसांनाही त्यापासून धोका होण्याची शक्यता आहे,” महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनीही उद्रेकाविषयी महत्त्वाची माहिती दिली. देशभरात २४० नवीन स्ट्रेन आढळून आले आहेत. त्यामुळेच  संसर्गाचा वेग वाढला असून, महाराष्ट्रातही मागील आठवड्यांपासून रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे, असं जोशी यांनी सांगितलं.

 

Exit mobile version