Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ३०८१ वर पोहोचला !

मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईत काल रात्रीपासून आतापर्यंत १०० नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. यासोबत राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ३०८१ वर पोहोचला आहे. बुधवारी महाराष्ट्रात दिवसभरात कोरोनाची लागण होऊन ९ जणांचा मृत्यू झाला. तर २३२ रुग्ण करोना पॉझिटिव्ह आढळले होते.

 

राज्यात बुधवारी २३२ कोरोना रुग्ण वाढले होते. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३ हजार ०८१ वर गेली आहे. ९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यापैकी मुंबईत २, पुण्यात ६ आणि अकोल्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. कोरोनामुळे राज्यात मृत्यूंची संख्या आता १८७ वर गेली आहे. बुधवारपर्यंत राज्यात २९५ रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, बुधवारपर्यंत ५२ हजार नमुन्यांपैकी ४८,१९८ जणांचे नमुने निगेटिव्ह आले. सध्या राज्यात ६९,७३८ जण होम क्वाॅरंटाइन, तर ५,६१७ जण संस्थात्मक क्वाॅरंटाइनमध्ये आहेत.

Exit mobile version