Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महाराणा प्रताप विद्यालयात निषाद चौधरी प्रथम

भुसावळ, प्रतिनिधी   ।  माध्यमिक शालांत परीक्षेत श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ संचलित महाराणा प्रताप विद्यालयात उज्वल विद्यालयाचा शंभर टक्के निकाल लागला असून त्यामध्ये निषाद मधुकर चौधरी याने शेकडा शंभर गुण प्राप्त करून विद्यालयात प्रथम येण्याचा सन्मान मिळविला. 

 

महाराणा प्रताप विद्यालयात निषाद चौधरी प्रथम तर अनिकेत महेश व्यवहारे ९९.४०% मिळून द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला तर तृतीय क्रमांक कौस्तुभ सुरेश खांडवेकर ९८.८०  गुण मिळवून विद्यालयातून तृतिय क्रमांक मिळवला. या सर्व विद्यार्थ्यांसह पालकांचा गुणगौरव संस्थेचे अध्यक्ष सोनु मांडे, चिटणीस उषा पाटील व विद्यालयाचे दोन्ही मुख्याध्यापक व पर्यवेक्षक शिक्षक  व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत गुणगौरव सोहळा संपन्न झाला.

 

Exit mobile version