Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महाराजस्व अभियाना अंतर्गत पिंप्रीत फेरफार नोंदीचे वाटप

 

पिंप्री खुर्द ता. धरणगाव, प्रतिनिधी । महसूल प्रशासन अधिक कार्यक्षम ,गतीमान अन् पारदर्शक करण्यासाठी तसेच सर्वसामांन्यांची शासकीय स्तरावरील रेगांळलेली , प्रलंबित कामे जलद गतीने व्हावीत , या उद्देशाने शासनाच्या वतीने पिंप्रीत महाराजस्व अभियाना अंतर्गत फेरफार अदालत धरणगाव येथे आयोजित करून विविध प्रकारच्या ३२ फेरफार नोंदीचे वाटप करण्यात आले.

तहसीलदार नितीन कुमार देवरे यांच्या अध्यक्षतेखाली तर जिल्हा परिषद सदस्य बापूसाहेब गोपाळ चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराजस्व अभियान अंतर्गत विविध प्रकारच्या फेरफार नोंदींचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी मंडळ अधिकारी सुरेश बोरसे , पोलीस पाटील गोपाल बडगुजर यांचा सह इतर मान्यंवर व शेतकरी बंधू मोठया सख्येने उपस्थितीत होते. या कार्यक्रमात पिंप्री मंडळातील वारस नोंदी, खरेदी, बोजा, हक्कसोड, अशा विवीध प्रकारच्या एकूण ३२ फेरफार घेण्यात आले व त्यांचे वाटप खातेदारांना करण्यात आले. यासोबत कास्ट सर्टिफिकेट , नॉन क्रिमिलियर , शिधापत्रिका , उत्त्पन्न दाखल्याचे देखिल वाटप करण्यात आले. या संगी पिंप्री मंडळातील तलाठी प्रज्ञा खंडेराव, मनीषा पोटे, सुमित गवई यांच्यासह बहुसंख्य शेतकरी बांधव उपस्थितीत होते. सुत्रसंचलन सुनील बडगुजर यांनी तर पिंप्री तलाठी सचिन कलोरे यांनी आभार मानले.

Exit mobile version