Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महामार्गावरील रस्त्याचे काम रेंगाळले; पाचोऱ्यात मविआतर्फे रास्ता रोको आंदोलन

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव-पाचोरा-कजगाव या राष्ट्रीय महामार्गावर सुमारे ९ कि. मी. अंतरावर रस्त्यांची चाळणी झालेली. हा रस्ता तात्काळ दुरुस्त करुन मिळावा या रास्त मागणीसाठी मंगळवारी २१ फेब्रुवारी रोजी महाविकास आघाडीतर्फे एकाचवेळी साखळी पद्धतीने तालुक्यातील नांद्रा येथे सकाळी ८ वाजता, पाचोरा येथील जारगाव चौफुलीवर सकाळी १०:३० वाजता, भडगाव येथे १० वाजता, नगरदेवळा येथे १०:३० वाजता व कजगाव येथे देखील १०:३० सुमारे अर्धा तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

या रस्ता रोको आंदोलना प्रसंगी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता. या रस्ता रोको आंदोलना प्रसंगी जारगाव चौफुली येथे मा. आमदार दिलीप वाघ, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष तथा मा‌. नगरसेवक विकास पाटील, भुषण वाघ, बशीर बागवान, अशोक मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान सभा क्षेत्र प्रमुख नितीन तावडे, खलील देशमुख, शहर अध्यक्ष अजहर खान, शालिग्राम मालकर, महिला आघाडीच्या ज्योती वाघ, सुलोचना वाघ, सरला पाटील, रेखा देवरे, जयश्री मिस्तरी, पी. डी. भोसले, रणजीत पाटील, सुदर्शन महाजन, हरुण देशमुख, तारीक अहमद, सैय्यद रज्जु बागवान, अॅड. अविनाश सुतार, सुदाम वाघ, बाबाजी ठाकरे, गोकुळ पाटील, वाजीद बागवान, गोपी पाटील, काॅंग्रेसचे शहर अध्यक्ष अॅड. अमजद पठाण, मा. सभापती शेख इस्माईल शेख फकिरा,ओ. बी. सी. तालुका अध्यक्ष इरफान मणियार, अमजद मौलाना, सोशल मिडिया विधान सभा अध्यक्ष राहुल शिंदे, एस. सी. सेलचे तालुका अध्यक्ष श्रावण गायकवाड, चंद्रकांत महाजन, इस्माईल तांबोळी, फईम शेख, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दिपकसिंग राजपूत, शहर प्रमुख अनिल सावंत, शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख अरुण पाटील, शेतकरी सेनेचे तालुका प्रमुख रमेश बाफना, युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख संदिप जैन, मा. नगरसेवक दत्ता जडे, पप्पु राजपुत, जितेंद्र जैन, समता सैनिक दलाचे जिल्हा समन्वयक किशोर डोंगरे, मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष सुनिल पाटील, संभाजी ब्रिगेडचे मुकेश तुपे, क्षत्रिय गृपचे कार्यकर्ते यांचेसह मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

तालुक्यातील नांद्रा, पाचोरा, भडगाव, नगरदेवळा व कजगाव याठिकाणी एकाचवेळी साखळी पद्धतीने सुमारे अर्धा तास रस्ता रोको आंदोलनात जारगाव येथे उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, नॅशनल हायवे चे उपविभागीय अभियंता विजय वाघ, शाखा अभियंता पोतदार यांनी भेट देऊन ५ मार्च पर्यंत रस्त्याच्या कामांची निवेदा काढण्यात येणार असल्याचे लेखी निवेदन दिल्यानंतर सदरचे रस्ता रोको आंदोलन तुर्त स्थगित करण्यात आले आहे. सुमारे अर्धा तास चाललेल्या रस्ता रोको आंदोलनामुळे पाचोरा ते भडगाव रस्त्यावरील दोन्ही बाजुच्या रहदारीस खोळंबा झाला होता.

Exit mobile version