महापौर , उपमहापौरांच्या अधिकाऱ्यांसह शहरातील रुग्णालयांना भेटी ; नियमानुसार पूर्ततेची तपासणी ( व्हिडीओ )

 

 

 

जळगाव : प्रतिनिधी |  महापौर जयश्री महाजन , उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी आज महापालिकेतील आरोग्य , अग्निशमन व लेखा विभागातील अधिकाऱ्यांना सोबत घेऊन शहरातील खाजगी रुग्णालयांची पाहणी केली . या रुग्णालयांनी नियमानुसार  सगळ्या पूर्तता केल्या आहेत का ?, याचीही तपासणी केली

 

या पाहणीनंतर पत्रकारांशी बोलताना महापौर जयश्री महाजन  म्हणाल्या की , आम्ही आज शहरातील ६ रुग्णालयांना भेटी दिल्या काही ठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण दाखल केले असल्याचे आढळले . महापालिकेतील आरोग्य , अग्निशमन व लेखा विभागातील सहकारी अधिकाऱ्यांना सोबत घेऊन ही पाहणी करण्यात आली दरफलकांसह अन्य नोंदी नियमानुसार आहेत कि नाही हे तपासले साधना हॉस्पिटलला भेट देऊन चौकशी केली त्यावेळी तेथील व्यवस्थापनाने चूक मान्य करून अशा चुका पुन्हा होणार नाहीत अशी हमी दिली बिलांबद्दल आलेल्या तक्रारींचीही चौकशी केली

 

 

उपमहापौर कुलभूषण पाटील म्हणाले की , डॉ घोलप , विकास पाटील , बारी आदी आमच्यासोबत होते या रुग्णालयांकडे आवश्यक त्या परवानग्या आहेत की नाहीत ? , याची तपासणी करण्यात आली काही ठिकाणी परवानगी नुसार असलेल्या क्षमतेपेक्षा जास्त बेड आढळले एका रुग्णालयाने  कोरोना  रुग्णाचा मृतदेह प्लास्टिक आवरणाऐवजी चादरीत गुंडाळून कुटुंबियांना दिल्याचा  प्रकार घडला होता त्या रुग्णालयाला सूचना आणि नोटीस देण्यात आली या रुग्णालयांच्या सरकारी नोंदणीचीही तपासणी करण्यात आली काही ठिकाणी त्रुटी आढळल्या त्या  त्रुटींबद्दल त्यांना नोटीस दिल्या त्यांनी ८ दिवसात त्रुटींची पूर्तता करण्याची हमी महापालिकेला दिली आहे  ऍक्सॉन हॉस्पिटलाकडून मनमानी ही आकारले गेल्याची तक्रार आली होती त्यांच्या चौकशीत त्यांनी बिल चुकीचं  आकारले गेल्याचे मान्य केले आणि अतिरिक्त पैसे संबंधितांना परत करण्याची हमी दिली आता शहरात रेमडीसीवीर  इंजेकशनचा साठा पुरेसा आणि पुरवठा अपेक्षेप्रमाणे असल्याचे या रुग्णालयांनी सांगितले आहे तथापि अजूनही काही लोंकाना हे औषध मिळत नसल्याचे वास्तव आम्ही मान्य करतो असे ते म्हणाले यापुढेही महापालिकेकडे तक्रारी आल्यास कारवाई करण्यात येईल आमचे जनतेला आवाहन आहे की प्रामुख्याने अवाजवी बीलांबद्दल तक्रारी असल्यास त्यांनी महापालिकेकडे यावे , असेही ते म्हणाले .

 

 

रेल्वे स्टेशन आणि बस स्थानकावर महापालिकेकडून बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांची अँटीजेन  तपासणी करण्यात येईल आणि तपासणीत कोरोनाचे निदान झाल्यास त्यांना महापालिकेच्या कोरोना सेंटरमध्ये पाठवले जाईल शहरात प्रभागनिहाय घरोघरी जाऊन कोरोना तपासण्या केल्या जातील लसींच्या पुरवठ्याच्या प्रमाणात सध्या महापालिकेची लसीकरण केंद्रे सुरु आहेत लसींचा पुरवठा वाढल्यावर लसीकरण केंद्रे वाढविण्याचे नियोजन महापालिकेने केलेले आहे असेही  यावेळी  महापौर जयश्री महाजन यांनी सांगितले .

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/844850112733960

 

Protected Content