Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महापौरांच्या संकल्पनेतून टीबी सनेटोरियमचा होणार कायापालट!

जळगाव,प्रतिनिधी । शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता भविष्यात नागरिकांना आरोग्य सेवा देताना मनपा प्रशासन कुठेही कमी पडू नये यासाठी शहरातील कंपन्या, सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून आरोग्यसेवा मजबूत करण्याच्या महापौरांच्या संकल्पनेतून टीबी सनेटोरियमचा कायापालट करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य उपाययोजना करण्याच्या दृष्टीने रविवारी महापौर भारती सोनवणे यांनी टीबी सनेटोरियमची पाहणी केली.

महापौर भारती सोनवणे यांनी टीबी सनेटोरियमची पाहणी करतांना नगरसेवक कैलास सोनवणे, उपायुक्त अजित मुठे, डॉ.राम रावलानी, नगरसेवक सदाशिव ढेकळे, प्रशांत नाईक, मनोज काळे, शहर अभियंता सुनील भोळे, डॉ.शिरीष ठुसे, उमेश सोनवणे, आशुतोष पाटील आदी उपस्थित होते.

शाळा, महाविद्यालय, हॉटेल, मंगल कार्यालयात व्यवस्था करणार
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टीबी सनेटोरियमची पाहणी करीत असताना त्याठिकाणी तात्काळ योग्य आरोग्य सुविधा उपलब्ध करणे शक्य नाही. त्यामुळे तूर्तास शाळा, महाविद्यालय, मंगल कार्यालय, हॉटेलमध्ये रुग्णांच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे त्याठिकाणी सर्वानुमते ठरले.

सेवाभावी संस्था, कंपन्यांची मदत घ्या
जळगावकर नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी टीबी सनेटोरियमचा विकास आवश्यक आहे. शहरातील सेवाभावी व्यक्ती, सामाजिक संस्था, मंडळ व कंपन्यांचे टीबी सनेटोरियमच्या विकासासाठी घेण्यासाठी प्रशासनाने पाठपुरावा करावा असेही त्या म्हणाल्या. टीबी सनेटोरियममध्ये अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झाल्यास परिसरातील नागरिकांना आणि भविष्याच्या दृष्टीने जळगावकरांना मोठा फायदा होणार आहे.

Exit mobile version