Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महापौरांकडून समृद्धी संतचे शिवतीर्थ मैदानावर स्वागत !

 

जळगाव,प्रतिनिधी  । नवी दिल्ली येथे राजपथावर प्रजासत्ताक दिनी झालेल्या पथसंचलनात एनसीसीच्या मुलींच्या ग्रुपची परेड कमांडर म्हणून महाराष्ट्राला प्रथम मान मिळवून देणाऱ्या जळगावची सिनिअर अंडर ऑफिसर समृद्धी संतचे शनिवारी जळगावात आगमन झाले. महापौर सौ.भारती सोनवणे यांनी शिवतीर्थ मैदानावर पुष्पहार आणि गुच्छ देऊन स्वागत केले. 

राजपथावर प्रजासत्ताक दिनी झालेल्या पथसंचलनात एनसीसीच्या मुलींच्या ग्रुपची परेड कमांडर म्हणून महाराष्ट्राला प्रथम मान मिळवून देणाऱ्या जळगावची सिनिअर अंडर ऑफिसर समृद्धी संतमुळे जळगावच्या शिरपेचात पुन्हा एकदा तुरा रोवला गेला आहे. रेल्वेस्थानकापासून काढण्यात आलेल्या रॅलीचा शिवतीर्थ मैदानावर समारोप करण्यात आला. महापौर सौ.भारती सोनवणे यांनी पुष्पहार, पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे, शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे आदी उपस्थित होते. तिच्या या कामगिरीबद्दल जळगाव महापालिका तसेच तिच्या महाविद्यालयात शिकली त्या मूळजी जेठा महाविद्यालय आणि त्यासह जळगावच्या सर्व सामाजिक संस्थांनी मिळून तिचे जोरदार स्वागत केले.  तर भव्य रॅलीच्या माध्यमातून समृद्धीचा मोठा सन्मान करण्यात आला. ठिकठिकाणी तिचे स्वागत करण्यात आले आहे. हातात तिरंगा घेऊन समृद्धी आणि तिचा परिवार देखील देशभक्तीने भारावून गेला. महापौर सौ. भारती सोनवणे, समृद्धी संत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण केले.

 

Exit mobile version