महापालिकेने खड्डे खोदले…मात्र बुजण्यास विसरले ! : अपूर्ण कामांमुळे नागरिक त्रस्त (व्हिडिओ )

 

जळगाव राहूल शिरसाळे । शहरातील धनाजी नाना महाविद्यालयाजवळ असणार्‍या दत्तनगर भागात महापालिका प्रशासनाने खड्डे खोदून ठेवल्यानंतर ते बुजविण्यात आलेले नाहीत. यामुळे परिसरातील नागरिक अक्षरश: त्रस्त झालेले आहे

दत्तनगर येथे मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत कामे केली जात आहेत. मात्र, मागील १५ दिवसांपासून अपूर्ण अवस्थेतील कामांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. रस्त्यांवरच खडी -डबर पडून असल्याने नागरिकांना घरांमध्ये जाणे देखील मुशकील झाले आहे. नागरिकांनी स्व खर्चाने सांडपाण्याची व्यवस्था केली होती. परंतु, महापालिकेने गटारी तोडून टाकली असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या अपूर्ण कामांमुळे लहान मुले पडून जखमी होण्याचे प्रकार देखील घडले आहेत. गटारी तोडून टाकल्याने सांडपाणी साचून परिसरात दुर्गंधी पसरली आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत विजय पाटील, अनंत जुनारे, केदार भांडारकर, पंकज येवले, अशोक बारी, गजानन चौधरी, बाळू पाटील, जगदीश नेहते आदी नागरिकांनी आपली व्यथा मांडून अपूर्ण काम त्वरित पूर्ण करण्यात यावे अशी मागणी केली आहे.

Protected Content