Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महापालिकेत विविध ११ समित्या गठीत (व्हिडिओ)

 

जळगाव,प्रतिनिधी । महापालिकेच्या विविध ११ विशेष समित्यांमध्ये भाजपाचे ५ व शिवसेनेचे २ याप्रमाणे प्रत्येक समितीत सदस्य घेण्यात यावेत असा प्रस्ताव स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, भाजप गटनेते भगत बालाणी व महिला व बालकल्याण समिती सभापती रंजना सपकाळे व इतर सदस्यांनी यांनी मांडला होता. यानुसार ११ समित्या गठीत करण्यात आल्यात. 

बांधकाम समिती, अतिक्रमण समिती, स्वच्छता समिती, पाणीपुरवठा समिती दवाखाने समिती, नियोजन समिती, आस्थापना समिती, विधी समिती, वाहन व्यवस्था समिती, शिक्षण समिती, विद्युत समिती या अकरा समित्या गठीत करण्यात आल्यात.  या समिती सदस्यांचे नाव भाजपा गटनेते भगत बालाणी व शिवसेना गटनेते अनंत जोशी यांनी बंद लिफाफ्यात महापौर सौ. भारती सोनवणे यांच्याकडे सुपूर्द केले. 

यानंतर महापौर सौ. भारती सोनवणे यांनी सर्व समिती सदस्यांची नावे जाहीर केलीत. 

बांधकाम समिती – प्रमुख -मुकुंद सोनवणे, सदस्य सुरेश सोनवणे, लताबाई भोईटे, धीरज सोनवणे. नितीन, नितीन बरडे, विक्रम सोनवणे.     

अतिक्रमण समिती – प्रमुख दत्तत्रय कोळी, सदस्य नवनाथ दारकुंडे, किशोर बाविस्कर, धीरज सोनवणे, कैलाश सोनवणे.नितीन बरडे, इबा पटेल,  

स्वच्छता समिती – प्रमुख जितेंद्र मराठे, सदस्य – रेश्मा काळे, सुरेखा तायडे, मीना सपकाळे, सुरेश सोनवणे, नितीन बरडे, प्रशांत नाईक.   

पाणीपुरवठा समिती- प्रमुख –  प्रवीण कोल्हे, सदस्य उज्वला बेंडाळे, प्रिया जोहरे, अमित काळे, शोभा बारी, नितीन बरडे, प्रशांत नाईक. 

विद्युत समिती प्रमुख – पार्वताबाई भिल, गायत्री राणे, कुलभूषण पाटील, सुनील खडके, उषा पाटील, नितीन बरडे, इबा पटेल.   

शिक्षण समिती प्रमुख सरिता नेरकर, सदस्य ज्योती चव्हाण, अंजनाबाई सोनवणे, खान रुक्सानाबी गबलू, सचिन पाटील, नितीन बरडे, प्रशांत नाईक.  

नियोजन समिती प्रमुख सदाशिव ढेकळे, सदस्य भगतराम बालाणी, सिंधू कोल्हे, सुरेखा तायडे, मंगला चौधरी, विष्णू भंगाळे, अनंत जोशी.     

अस्थापन समिती प्रमुख ज्योती चव्हाण, सदस्य मनोज आहुजा, शेख हसीना बी शरीफ, राजेंद्र पाटील, चेतना चौधरी, नितीन बरडे, प्रशांत नाईक.  

विधी समिती प्रमुख अड. दिलीप पोकळे, सदस्य ललित कोल्हे. गायत्री राणे, रंजना सोनार, चेतन सनकत, सुनील महाजन, अनंत जोशी.

दवाखाना समिती प्रमुख डॉ. चंद्रशेखर पाटील, अश्विन सोनवणे, कांचन सोनवणे, विश्वनाथ खडके, प्रतिभा पाटील, नितीन बरडे, मनोज चौधरी. 

वाहन समिती विजय पाटील प्रमुख रेखा पाटील, प्रतिभा देशमुख, सुरेखा सोनवणे, मीनाक्षी पाटील,  नितीन बरडे, विक्रम सोनवणे.      

 

 

 

Exit mobile version