महापालिकेच्या पथविक्रेता समिती गठनाच्या पद्धतीवर मनसेची हरकत (व्हिडिओ)

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | आज महापालिकेत पथविक्रेता समितीची पहिल्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.  ही बैठक रद्द करून नवीन समिती  गठीत करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनपा आयुक्त यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनाचा आशय असा की, बुधवार दि. २३ मार्च रोजी पथविक्रेते समिती गठीत करण्यात आलेली आहे व आज दि. २५ मार्च समितीची पहीली बैठक घेण्यात येत आहे. ज्या हॉकर्स बांधवांचे नावे पथविक्रेते समितीत घेण्यात आलेले आहेत ते कोणाच्य सांगण्यावरुन समिती गठन करण्यात आलेली आहे. सर्व प्रथम या बैठकीत त्याचा खुलासा व्हावा तसेच समितीत पर्ण हॉकर्स आहेत काय? असल्यास त्यांनी हॉकर्स असल्याचे पुरावे सादर करावेत किंवा ज्यांच्या शिफारशीवर समितीत घेण्यात आलेली आहे. त्या त्या शिफारसदाराचे पत्र किंवा लेखी स्वरुपाचे अर्ज किंवा हॉकर्स बांधवाच्य नियुक्तीतून आलेले सदस्य समितीत असणे अवश्यक आहे. तसे प्रथमतः तपासून पाहावे जे हॉकर्स बांधव राजकारणातून पथ विक्रेते समितीत आले असतील त्यांना व जे गठीत समिती असतील मात्र हॉकर्स नाहीत अशा सदस्याना समितीतून रद्द बातल करण्यात यावे व नविन लोक नियुक्तीतून सदस्य समितीत सदस्य घ्यावेत अन्यथा हॉकर्स बांधवानकडून जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जळगांव शहर उप महानगर अध्यक्ष आशीष सपकाळे, तसेच सहकारी मंगल भालेराव, मंगल शीरसाठ, राजू डोंगरे, शिवा पुरोहीत, तसेच मनसेचे पदधिकारी अदींनी दिला आहे. समिती गठीत करतांना सर्वानुमते नियुक्त केलेल्या व्यक्तीलाच समिती सदस्य घ्यावे प्रत्येक वार्डतून गल्लीतून हॉकर्स झोन तयार करण्यात यावा त्यांचे संघटन करण्यात यावे व संघटन मधून नियुक्त केलेल्या व्यक्तीला पथविक्रेते समितीत घ्यवा व त्यानंतरच बैठकीचे पुढील विषयांवर कामकाज चालू करावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेने आयुक्तांना करण्यात आली.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1305526989942660

 

Protected Content