Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महापालिकेच्या पथकावर हॉकर्सचा हल्ला

जळगाव प्रतिनिधी । शहरातील मास्टर कॉलनी व अक्सा नगरात भरविण्यात आलेला बाजार उठविण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकावर काही हॉकर्सनी हल्ला चढविल्याची घटना घडली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून अक्सानगर व मास्टर कॉलनीत दर बुधवारी बुध बाजार भरवण्यात येत आहे. यासाठी महापालिकेने परवानगी दिलेली नाही. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मशीद व शाळेच्या आवारात भरणारा बाजार उठवण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या पथकावर बुधवारी सकाळी १० ते ११ वाजेदरम्यान धक्काबुक्की करत हल्ला करण्यात आला. याप्रकरणी व्हिडिओ चित्रण करण्यात आले असून दोषींना शोधून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.
पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने सकाळी विक्रेत्यांना हटवण्याचा प्रयत्न केला. या वेळी काही विक्रेत्यांचा मालही जप्त केला. दरम्यान, ५० ते ६० जणांच्या विक्रेत्यांच्या जमावाने पथकावर हल्ला केला. या वेळी ट्रॅक्टरमध्ये जप्त केलेला माल वाहनात चढून हिसकावून घेतला. त्यामुळे प्रचंड तणाव निर्माण झाला होता.

Exit mobile version