Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महादेव मंदीरात चोरी; चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

जळगाव लाईव्ह ट्रेन्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील भिकमचंद जैन नगरात असलेल्या महादेवाच्या मंदिरातील पितळी त्रिशूल, तांब्याची कळशी आणि तांब्याचा नाक असा एकूण ३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेला. याप्रकरणी गुरुवार २२ जून रोजी दुपारी १ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरातील भिकमचंद जैन नगरात महादेव मंदिर आहे. या मंदिरात राजेश रघुवीर गुप्ता यांच्या खाजगी जागेत बांधण्यात आले आहे. २१ जून रोजी रात्री ८ ते सकाळी ७ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने वॉल कंपाऊंडवरून उडी घेत मंदिरातील तांब्याचा कळशी, तांब्याचा नाग आणि पितळी त्रिशूल असा एकूण ३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला चोरी करताना चोरटा सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. या संदर्भात व्यापारी राजेश गुप्ता यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुरुवार २२ जून रोजी दुपारी १ वाजता शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय निकुंभ करीत आहे.

Exit mobile version