Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्त योजनेच्या आधार प्रमाणीकरणास मुदत वाढ!

जळगाव,प्रतिनिधी | महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजनेअतंर्गत अनेकांचे कर्जखात्याचे आधार प्रमाणीकरण करणे बाकी आहे. यासाठी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळून देण्यासाठी प्रशासनाने आधार प्रमाणीकरनाची मुदत वाढ १५ नोव्हेबरपर्यंत केली आहे.

महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजना-२०१९ अतंर्गत जळगाव जिल्ह्यातील 1 हजार 624 कर्जखात्याचे आधार प्रमाणीकरण करणे बाकी आहे. ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण बाकी असेल त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर, 2021 या दरम्यान विशेष मोहिम राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक सहकार संतोष बिडवई यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे. या योजनेचे कामकाज अंतिम टप्प्यात असून त्याअनुषंगाने प्रलंबित आधार प्रमाणीकरण व तक्रार निराकरण या टप्प्यावरील कामकाज विशेष कालमर्यादेत पुर्ण होण्याच्यादृष्टीने ही मोहिम राबविण्यात येत आहे. तरी जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करणे बाकी आहे. अशा शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी या विशेष मोहिमेचा लाभ घेऊन 15 ऑक्टोंबर ते 15 नोव्हेंबर, 2021 या विशेष मोहिम कालावधीत आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे. त्यांना आधार प्रमाणीकरणासाठी ही अंतिम संधी देण्यात येत आहे. या कालावधीत आधार प्रमाणीकरण न केल्यास या योजनेतंर्गत कर्जमाफीचा लाभ मिळू शकणार नाही, असेही जिल्हा उपनिबंधक बिडवई यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

 

Exit mobile version