महात्मा फुले कर्जमुक्तीसाठी चाळीसगावातील ‘इतके’ लाभार्थी ठरलेत पात्र !

चाळीसगाव – जीवन चव्हाण | महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजनेची जिल्ह्यातील शेतकर्‍यांची दुसरी यादी नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली असून यात तालुक्यातील लाभार्थ्यांची माहिती देखील समोर आली आहे.

अल्पमुदतीच्या पीककर्जाची नियमितपणे परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन २०१७-१८, सन २०१८-१९ आणि सन २०१९-२० हा कालावधी विचारात घेण्यात आला आहे. या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करुन नियमित परतफेड केलेल्या शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजनेअंतर्गत ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येते. याची दुसरी यादी नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली असून चाळीसगाव तालुक्यातील तब्बल ३ हजार नऊशे ६८ लाभार्थी पात्र ठरले आहे. त्यामुळे पात्र ठरलेल्या शेतकर्‍यांनी तत्काळ ग्राहक सेवा केंद्र’ वर जाऊन आपले आधार प्रामाणिकरण करून घेण्याचे करण्यात आले आहे.

Protected Content