Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महात्मा गांधी मार्केटमधील व्यापाऱ्यांचे थाळीनाद आंदोलन (व्हिडिओ)

 

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील महापालिका मालकीच्या १६ गाळेधारकांचा आजपासून बेमुदत संप पुकारला आहे. यानुसार फुले व गोलाणी मार्केट सोडून शहरातील १६ व्यापारी संकुलांमध्ये पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहेत. बेमुदत बंदच्या पहिल्या दिवशीच महात्मा गांधी मार्केटमधील व्यापाऱ्यांनी थाळीनाद आंदोलन करून त्यांच्यावरील होणारा अन्याय थांबवावा अशी मागणी केली आहे. 

महापालिकेने थकबाकीदार गाळेधारकांवर कारवाईचा बडगा उचलला आहे. यात महापालिका पथकाने दोन दिवसापूर्वी महात्मा गांधी मार्केटमधील गाळा सील करण्याची कारवाई केली होती. यास गाळेधारकांनी विरोध केला होता. त्यावेळी मनपा पथकातील अधिकाऱ्यांनी वरिष्ठांनी बोलून कारवाई थांबवली होती. मागील आठ ते नऊ वर्षापासून गाळेधारकांचा प्रश्न प्रलंबित असून यावर लवकरच तोडगा काढण्यात यावा अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र, महापालिकेकडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य केले जात नसल्याने महात्मा गांधी मार्केटमधील व्यापाऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंग पाळून थाळीनाद आंदोलन करून याचा निषेध केला. यावेळी महात्मा गांधी मार्केट असोसिएशन अध्यक्ष पंकज मोमाया यांनी ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’ शी बोलतांना सांगितले की, राज्य शासनाने आम्हाला न्याय द्यावा, इतर महापालिकांमध्ये ज्याप्रमाणे गाळेधारकांकडून बिलाची आकारणी करण्यात येत त्याच प्रमाणे जळगावात देखील करण्यात यावेत. महापालिकेने रेडीरेकनरप्रमाणे भाडे आकारणे अन्यायकारक असून योग्य तोडगा काढण्यात यावा अशी अपेक्षा व्यक्त केली.     

भाग १

 

भाग २

Exit mobile version