महाजॉब्स ही योजना आघाडी सरकारची आहे, की शिवसेना-राष्ट्रवादीची? : सत्यजित तांबे


मुंबई (वृत्तसंस्था)
महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीत केवळ शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो असल्याने महाजॉब्स ही योजना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची आहे, की शिवसेना-राष्ट्रवादीची?, असा थेट सवाल युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी विचारला आहे.

 

 

याबाबत सत्यजित तांबे यांनी ट्विट करुन म्हटले आहे की, महाजॉब्स ही योजना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची आहे की, शिवसेना-राष्ट्रवादीची? आघाडीचे गठन होत असताना ठरलेल्या किमान समान कार्यक्रमाची व त्यातील शिष्टाचारांची अंमलबजावणी का होत नाही? हा माझ्या सारख्या सामान्य काँग्रेस कार्यकर्त्याला पडलेला प्रश्न आहे, अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, सत्यजीत तांबे यांनी काँग्रेस नेत्यांचे फोटो नसल्याने नाराजी व्यक्त केली असली, तरी http://mahajobs.maharashtra.gov.in या वेबसाईटच्या होमपेजवर डावीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे फोटो आहेत.

Protected Content