Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महागाईविरोधात राष्ट्रवादीतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बॅनर्सची महाआरती (व्हिडिओ)

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | देशात पेट्रोलचे डिझेल गॅस व जीवनावश्यक वस्तूच्या वाढत्या दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे सागरपार्क येथील पेट्रोल पंपावर पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या बॅनरची महाआरती करून आंदोलन करण्यात आले.

 

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. देशात इंधन व जीवनावश्यक वस्तूच्या भाववाढी विरोधात पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या बॅनरची महाआरती करत आंदोलन करण्यात आले. सर्व सामान्य जनता, हातावर पोट भरणाऱ्या मोल मजुरी करणाऱ्या वर्गाला तर गॅस महागल्यामुळे अन्न शिजवणे देखील अवघड होवून बसले आहे. महागाईमुळे मूलभूत गरजा देखील भागवण कठीण होऊन बसले आहे. या अनुषंगाने राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीतर्फे पेट्रोल पंपावर असलेल्या पंतप्रधान मोदी यांच्या बॅनर्सची महाआरतीकरण्यात आली. पेट्रोलचे डिझेल गॅसचे दर हे गगनाला भिडले असून सर्वसामान्य नागरिकांचे जगणे मुश्किल झालं आहे या भाववाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे जळगावातील सागर पार्क येथील पेट्रोल पंपावर जीवनावश्यक वस्तूच्या भाववाढी विरोधात पंतप्रधान नरेंद मोदी पेट्रोल पंपावरील बॅनरची महाआरती करण्यात आली. या प्रसंगी राष्ट्रवादी युवक प्रदेशमा आदेशाने राष्ट्रवादी युवक शहर जिल्हाध्यक्ष रिकू  उमाकांत चौधरी, सुनील माळी आदींनी सागर पार्क समोरील पेट्रोल पंपावर मोदींच्या फोटोला हार घालून व आरती करून आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारच्या या भांडवलशाही व धोरणा विरोधात  हाक देऊ असून सर्वांनी एकत्र येऊन हवा मोदी सरकार पर्वत त्या महागाईचा आता तरी समजून घ्या अशी त्यांची आरती करून आगळ वेगळं आंदोलन पार पडले.

 

Exit mobile version