Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महसूल कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाचा आठवा दिवस

 

जळगाव – महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात आठ दिवस होवूनही शासनाकडून कोणताही सकारात्मक निर्णय झालेला नाही. महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने मागण्या मान्य होईपावेतो संप सुरुच ठेवणार असल्याचा निर्धार या कर्मचाऱ्यांचा आहे.

अवर सचिव महसूल विभाग यांचेकडे मागण्यांसंदर्भात झालेल्या बैठकीत शासनाकडून कोणत्याळी स्वरुपाची सकारात्मकता दाखविली गेलेली नाही. सद्यस्थितीत महसूल कर्मचारी आंदोलन शिस्तबध्दरित्या व सनदशीर मार्गाने सुरु आहे. तसेच या पुढे सुरु राहणार आहे. या बेमुदत संपात जिल्ह्यातील सर्व पंधरा तालुके, सात उपविभाग व जिल्हाधिकारी कार्यालय यांमधील सर्व महसूल कर्मचारी सहभागी झालेले आहेत. आंदोलनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करुन, घोषणा देण्यात आल्या.
दरम्यान यावेळी आ. सुरेश भोळे, यांनी महसूल कर्मचारी संघटनेच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलनस्थळी भेट देत आंदोलनास आपले समर्थन असल्याचे जाहिर केले. तसेच महसूल कर्मचारी संघटनेच्या सर्व मागण्या पुर्ण होणेबाबत शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचेहि आ.भोळे यांनी सांगितले यावेळी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनस्थळी जामनेर, भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर येथील सर्व अधिकारी व कर्मचारी ,राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे सर्व जिल्हा, उपविभाग व तालुका स्तरीय सर्व पदाधिकारी व महसूल कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Exit mobile version