महविकास आघाडीतर्फे एरंडोल बंदचे अवाहन

एरंडोल, प्रतिनिधी | येथे उद्या सोमवार दि. ११  रोजी  राज्यातील महाविकास आघाडीच्या वतीने शेतकरी विरोधी केन्द्र सरकारच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंद चे अवाहन व्यापारी वर्गास करण्यात आले आहे.

 

लखीमपूर खेरी सिमेवरील अंदोलोक शेतकऱ्यांनी हरियाणाचे मुख्यमंत्री व केंद्रीय राज्यमंत्री यांच्या गाड्यांच्या ताफ्यास काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला.त्यारागाच्या भरात  या हुकुमशहा व गुंड प्रवृत्तीच्या केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाची ताफ्यामध्ये असलेल्या गाडीने चार शेतक-यांना चिरडून ठार मारण्यात आले.बारा शेतकऱ्यांना गाड्यांखाली चिरडण्यात आले. त्यासाठी केंद्र सरकारचा निषेध करुन दोषीवर गुन्हा दाखल करण्याची व आरोपीच्या अटकेची मागणी करण्यासाठी व मृत शेतकऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी,आंदोलक शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी  सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच सर्व शेतकरी व शेतकरी संघटना व विविध संघटनांनी महाविकास आघाडीच्या या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे.तरी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आंबेडकर पुतळा येथे हजर राहावे असे अवाहन काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विजय महाजन, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रा.मनोज पाटील व शिवसेनेचे तालुका अध्यक्ष वासुदेव पाटील यांच्याकडून करण्यात आले आहे.

 

Protected Content