Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मस्करी केल्याच्या रागातून दोघा भावांना बेदम मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील काशिनाश चौकात मस्करी केल्याच्या कारणावरुन तरुणाला तीन ते चार जणांनी लोखंडी पाईपने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव शहरातील सुप्रिम कॉलनीत मनीष सतीश काळे हा त्याच्या कुटुंबासह वास्तव्यास आहे. रविवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास मनीष याचा भाऊ व सुप्रिक कॉलनीतच राहणारा गोलू नवल सगणे हे एकमेकांची मस्करी करत होते, मस्करी केल्याच्या कारणावरुन गोलू बरोबरच चमकाबाई, बाळू धाडी  तसे नवल या तीन जणांनी  आकाश यास चापटाबुक्क्यांनी मारहाण केली, यादरम्यान बाळू धाडी याने आकाशच्या डोक्यात लोखंडी पाईप मारला, आकाश यास सोडविण्यासाठी त्याचा भाऊ मनिष केला असता,  त्याला शिवीगाळ करत दगड मारुन जखमी केले. या मारहाणीत आकाश व त्याचा भाऊ मनिष हे दोन्ही जखमी झाले असून मनिष याने दिलेल्या तक्रारीवरुन गोलू नवल सगणे,  चमकाबाई, बाळू धाडी  तसे नवल पूर्ण नाव माहित नाही या चार जणांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय धनगर हे करीत आहेत.

Exit mobile version