Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विजय माल्ल्याची फ्रान्समधील संपत्तीचा होणार लिलाव

vijay mallya

नवी दिल्ली प्रतिनिधी । भारतीय स्टेट बँकेसह विविध बँकांचे सुमारे ९ हजार कोटींचे कर्ज बुडवून विदेशात पसार झालेला उद्योगपती विजय माल्ल्याचा बाजार उठला आहे. माल्ल्याची भारतातील अनेक मालमत्तांवर टाच आलेली असतानाच फ्रान्समधील संपत्तीही विकली जाणार आहे.

मल्ल्याने गिज्मो इन्व्हेस्ट एसए या कंपनीच्या माध्यमातून ल गॉ जादा नावाची हवेली खरेदी केली होती. या हवेलीवर त्यांनी कतार नॅशनल बँकेची शाखा असलेल्या अंसबाचर अँड कंपनीकडून कर्ज घेऊन १४० कोटी रुपये खर्च केले होते. मात्र बँकेने लंडनच्या कोर्टात खटला दाखल करून मल्ल्याची कंपनी कर्जाची परतफेड करण्यास अपयशी ठरल्याचं म्हटलं होतं. मल्ल्याने त्याचा साऊथ इंग्लंडमध्ये असलेला ५० मीटर सुपरयाट विकावा आणि कर्जाची परतफेड करावी, अशी मागणी बँकेने कोर्टात केली आहे. २६ कोटीच्या लोन सेक्युरिटीसाठी मल्ल्याने ही बोट गहाण ठेवल्याचंही बँकेने कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं आहे.

२०१५पर्यंत मल्ल्यावर लोन थकलेलं होतं तेव्हा ब्रिटिश मल्टिनॅशनल कंपनी डायजियो पीएलसीने त्याच्यावर ६५० कोटी आणि भारतीय बँकांनी ९ हजार कोटींचा दावा केला होता. त्यावेळी फ्रेंच आयलँड इल सँट माग्युरेटमध्ये त्याची १.३ हेक्टरवरील ही मालमत्ता अत्यंत जीर्ण झाली असल्याचं बँकेचे वकील गिडन शिराजी यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं.

Exit mobile version