Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मलिकांवर दाखल होणार एक हजार कोटींचा दावा ! : स्वीकारले आव्हान

मुंबई प्रतिनिधी | क्रूझ प्रकरणावरून भाजप नेत्यांनी नवाब मलीक यांच्यावर एक हजार कोटी रूपयांचा दावा दाखल करण्याची घोषणा केली असतांना त्यांनी देखील हे आव्हान स्वीकारले आहे.

भाजप नेते मोहित कंबोज यांनी नवाब मलिकांविरोधात १ हजार कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल करण्यात आला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी त्याबाबतची माहिती दिली आहे. प्रवीण दरेकर यांनी ट्वटरवरुन माहिती देताना सांगितले की, मनवाब मलिकांविरोधात एक हजार कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा खटला दाखल केला आहे. त्यांनी उत्तर देण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितला आहे. या ट्विटला मलिक यांनी ट्विटच्याच माध्यमातून उत्तर दिले आहे.

नवाब मलिक यांनी आ देखें ज़रा किसमें कितना है दम अशा कॅप्शनसह मलिकांनी दरेकरांना ओपन चॅलेंज दिलं आहे.तसेच त्यांनी ट्विटमध्ये प्रवीण दरेकरांनाही टॅग केलं आहे. या प्रकरणात मलिकांनी माझगाव न्यायालयात हजेरी लावली. यावेळी त्यांनी सर्व पुरावे माझ्याकडे आहेत, ते सर्व पुरावे आम्ही न्यायालयाला सादर करू. आमच्या वकिलांनी न्यायालयाच्या रेकॉर्डवर ही व्यक्ती फ्रॉड असल्याचा मुद्दा आणला आहे, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली.

Exit mobile version