Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मला पण बागायतदार बनवा शेतकऱ्याची मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे आर्त हाक

indian farmer

पारोळा, प्रतिनिधी । सौरकृषी पंपासाठी पैसे भरून देखील अधिकारी त्यास हेतुपुरस्सर वंचित ठेवत असल्याने तालुक्यातील होळपिंप्री येथील एका शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून तुमचा पाया पडतो साहेब मला ही बागायतदार बनवा अशी आर्त हाक दिली आहे.

यासंदर्भातील हकीगत अशी की, होळपिंप्री येथील वसंत वना पाटील या शेतकऱ्यांचे मुख्यमंत्री सौरकृषी पंप साठी पैसे भरून सुध्दा अधिकारी योजनेपासून वंचित ठेवत आहेत. एकाच गावातील तिन शेतकऱ्यांन पैकी दोन शेतकऱ्यांना लाभ मिळाला व एक शेतकऱ्यांला उडवाउडवीचे उत्तर मिळत आहेत. तुमचे अतिविकसीत गाव आहे. तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही. असे सांगितले जात आहे. गावतील तीन शेतकऱ्यांचे पैकी दोन शेतकऱ्यांना लाभ आणि एकाला का नाही ? असा प्रश्न या शेतकऱ्यांने थेट मुख्यमंत्रीना पत्राद्वारे विचारला आहे.शेतकऱ्यांने महावितरणच्या साईटवर जावून एल & टी कंपनीची निवड केली व त्यात महावितरण चा ऑपवर ते पेंडीग दिसत आहेत. गावातील दोन शेतकऱ्यांना मात्र परवानगी दिली आहे. सर्व कागदपत्रे व अॉनलाईन एक वर्षांपासून पैसे भरून सुध्दा मला योजनेपासून अधिकारी वंचित का ठेवत आहेत. आसा प्रश्न उपस्थित करून या शेतकऱ्यांने मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री,ऊर्जामंत्री,राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू , मुख्य कार्यकारी अधिकारी जळगाव यांना पत्र लिहिली असून मला देखील बागायतदार शेतकरी बनण्यासाठी न्याय मिळावा असी विनंती वजा आक्रोश केला आहे.

Exit mobile version