Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मला तुमच्या ‘तिसरी लाट’ चित्रपटात काम द्या, मी मृतदेह मोजू शकतो ; निर्मात्याचा मोदींना उपरोधिक टोला

मुंबई : वृत्तसंस्था । मला तुमच्या ‘तिसरी लाट’ चित्रपटात काम द्या, मी मृतदेह मोजू शकतो  , अशी उपरोधिक टीका निर्माते दिग्दर्शक राम गोपाळ वर्मा यांनी मोदी सरकारवर  केली  आहे

देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव  वाढत आहे. दररोज वाढणारी संख्या भयावह आहे.  आता वैद्यकीय सेवांचा तुटवडा भासू लागला आहे. अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजन तुटवड्यामुळे, औषधांच्या कमतरतेमुळे अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागल्याचंही समोर येत आहे.

समाजातल्या सर्व स्तरांमधून आता मोदी सरकारवर टीका केली जात आहे. दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनीही आता ट्विट करत उपरोधिक शैलीत टीका केली आहे.

आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, “सर नरेंद्र मोदीजी, मी एक सभ्य हॉरर चित्रपट निर्माता आहे. पण माझी तुम्हाला विनंती आहे की मला तुमच्या आगामी “तिसरी लाट” या हॉरर चित्रपटात स्पॉट बॉयचं काम द्या. मी मृतदेह मोजण्याच्या विभागातही काम करु शकतो. कारण, तुमच्याइतकेच मलाही मृतदेह आवडतात पण कारणं वेगवेगळी आहे”.

देशात  स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. रुग्णसंख्या वेगाने वाढत असून मृतांची संख्याही वाढत आहे. आज सकाळी पूर्ण झालेल्या २४ तासांमध्ये देशात ८० हजार ९३४ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे  बाधितांचा आकडा आता ३३ लाख ४९ हजार ६४४ वर पोहोचला आहे. तर ३ लाख ७ हजार ८६५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. देशात काल दिवसभरात एकूण ३,६८९ मृतांची नोंद झाली.

 

Exit mobile version