Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मला जाऊ द्या…पण खडसेंना तरी उमेदवारी हवी होती !

मुंबई प्रतिनिधी । भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी आपल्याला नव्हे पण किमान एकनाथ खडसे यांना तरी भाजपची उमेदवारी हवी होती अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

भाजपने रामदास आठवले, उदयन राजे भोसले आणि भागवत कराड यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. खरं तर तिसर्‍या जागेसाठी संजय काकडे आणि एकनाथराव खडसे यांच्यात तिकिटासाठी चुरस होती. पण पक्षाने डॉ. भागवत कराड यांना उमेदवारी दिली आहे. खडसे यांनी आपण तसेही राज्यसभेसाठी इच्छुक नव्हतोच अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर संजय काकडे यांनी मात्र नाराजीसा सूर लावला आहे. आपल्याला जाऊद्या पण किमान एकनाथराव खडसे यांना तरी तिकिट मिळायला हवे होते असे ते म्हणले.

Exit mobile version