Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मलकापुरात ई-पॉज मशीनची मिवरवणूक काढून तहसीलदारांना केले सुपूर्द

मलकापूर अमोल सराफ | येथे सरकारी स्वस्त धान्य दुकानदारांनी ई-पॉज मशीनची होणारी तांत्रिक अडचण वारंवार मागणी करून देखील दूर करण्यात आलेली नाही. या अनुषंगाने या ई-पॉज  मशीनची   मिरवणूक काढून  तहसीलदारांकडे सुपूर्द करण्यात आले.

 

राज्यातील लाभार्थ्याना सरकारी स्वस्त धान्य दुकानामार्फत धान्याचे वितरण करण्यात येते. धान्य वितरण हे पारदर्शी ह्वावे या करिता शासनाने ई पॉज मशीनच्या सहाय्याने लाभार्थीचे अंगठे घेऊन धान्य वितरीत करण्यात येते. परंतु काही दिवसांपासून ई-पॉज मशिनच्या तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे लाभार्थी व दुकानदार तुफान खडाजंगी पाहायला मिळत आहे. यामुळे त्रस्त होऊन बुलढाणा जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी आपल्याकडील ई पॉज मशीन घेऊन मोर्चा काढून आज शुक्रवारी तहसील कार्यालयाला जमा करण्यात आल्या. स्वस्त धान्य दुकानदारानं देण्यात आलेले ई पॉज मशीन टू जी सपोर्टेड असल्याने आणि वेळोवेळी नादुरुस्त होत असल्याने दुकानदार आणि लाभार्थ्यांमध्ये वाद विवाद होण्याचे प्रमाण वाढले आहे. यासाठी राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारानी ३१ मार्चपर्यंत या अडचणीवर उपाय शोधावा अन्यथा १ एप्रिल २०२२ पासून सर्व दुकानदार आपल्या ई-पॉज मशिना आप-आपल्या तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात जमा करतील अशा आशयाचे निवेदन स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने जिल्हाधिकारी यांना शासनाकडे दिले होते. त्यानुसार आज बुलढाणा जिल्ह्यासह राज्यातील सर्वच ठिकाणी सरकारी स्वस्त धान्य दुकानदारांनी आपल्याकडील ई-पॉज तहसील कार्यलयाला जमा केल्या आहेत. तत्पूर्वी या ई-पॉज मशीनची मिवरवणूक काढण्यात आली.

Exit mobile version