Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मराठा आरक्षण राज्य सरकारचा विषय – खा. संभाजीराजे

 

पंढरपूर : वृत्तसंस्था । मराठा आरक्षण हा मुख्यत्वे राज्य सरकारचा विषय असून यामध्ये केंद्र सरकारची मदत लागली आणि घटना बदलण्याचाही विषय असेल तर त्याबाबतही माझा अभ्यास सुरु आहे. असं वक्तव्य खासदार संभाजीराजेंनी केलं आहे.

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पंढरपूरच्या महापुरानंतरच्या परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर ते म्हणाले की, “मराठा आरक्षण हा राज्याचा विषय आहे. आपण एसीबीसी हा कायदा तयार केला आहे. मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागास असल्याचं मागासवर्गीय आयोगने म्हटलं आहे त्यामुळे ते सिद्ध झालं आहे.

दरम्यान विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदारांनी मराठा आरक्षणासंदर्भातल्या कायद्याला मंजुरी दिली आहे. तो पारित झाला असून हायकोर्टानेही त्याला मान्यता दिली आहे. तरीही मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही तर केंद्र सरकारची काही मुव्हमेंट असेल उदा. घटना बदल करायची असेल तर त्या दृष्टीनेही माझा अभ्यास सुरु आहे. घटना बदल केल्यास तो विषय देशासाठीच लागू होईल” असंही संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे. आरक्षणाचा विषय दोन्ही छत्रपतींनी केंद्र सरकारकडून सोडवून घ्यावा असा सल्ला शरद पवारांनी दिला होता. याबाबत भाष्य करण्याचे मात्र संभाजीराजेंनी टाळले.

Exit mobile version