Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ममुराबाद येथील तरूणाची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी । घरात सर्वजण झोपलेले असतांना तरूणाने वरच्या मजल्यावरील घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील ममुराबाद येथे घडली याप्रकरणी तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, शकील मुसा पटेल (वय-३६) रा. ममुराबाद ता.जि.जळगाव हा आपल्या आईवडील सोबत राहतो. गेल्या महिन्याभरापासून घरीच बसून होता. दरम्यान बुधवारी रात्री उशीरापर्यंत जेवण झाल्यानंतर सर्वजण झोपले आणि शकील पटेल हा एकटाच वरच्या मजल्यावर झोपला होता. आज सकाळी वडील मुसा पटेल हे शकीलला उठविण्यासाठी गेले असता त्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. तालुका पोलीसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. पोलीस पाटील धनराज सुरेश पाटील यांच्या खबरीवरून तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ सोनार करीत आहे.

Exit mobile version