Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ममता बॅनर्जींची घोषणा ; पश्चिम बंगालमध्ये सर्वांसाठी मोफत लस

 

 

 

कोलकाता : वृत्तसंस्था । पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज महत्त्वाची घोषणा केली आहे. राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीला आता पश्चिम बंगाल सरकार मोफत लस देणार आहे.

 

दक्षिण दिनाजपूर भागातल्या   सभेत   त्यांनी ही घोषणा केली   ५ मेपासून राज्यात जे   पात्र असतील त्या सर्वांना लस पूर्णपणे मोफत दिली जाणार आहे. ममता यांनी नुकतंच लसींच्या नव्या किमतींवरुन केंद्र सरकारवर ताशेरे ओढले होते.

 

त्या म्हणाल्या होत्या, “भाजपा कायम एक देश, एक पक्ष, एक नेता असं ओरडत असतं. पण लोकांचे प्राण वाचवण्यासाठी ते लसीची एक किंमत मात्र ठरवू शकत नाहीत. प्रत्येक भारतीयाला मोफत लस मिळायला हवी. यासाठी त्यांचं वय, जात, पंथ, स्थळ अशा कोणत्याही मर्यादा नकोत. खर्च केंद्र करो किंवा राज्य, पण भारत सरकारने देशभरात कोरोना प्रतिबंधक लसीची एकच किंमत ठरवून द्यायला हवी.”

 

 

सिरम या लस उत्पादक कंपनीने कालच त्यांच्या कोविशिल्ड या लसीच्या नव्या किमती जाहीर केल्या. यानुसार, राज्य सरकारांना ही लस ४०० रुपयांना मिळणार असून खाजगी दवाखान्यांना हीच लस ६०० रुपयांना मिळणार आहे.

 

ममता यांनी लसीच्या एका किमतीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्रही लिहिलं आहे. देशात सध्या लसीकरण मोहीम राबवली जात आहे. आज देशात सकाळी पूर्ण झालेल्या २४ तासात देशात एकूण २२ लाख ११ हजा ३३४ लाभार्थ्यांनी लस घेतली.

Exit mobile version