Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मनिषा देवगुणे लिखित “शब्दात गुंतले मी..” पुस्तकाचे मंत्री देसाईंच्या हस्ते प्रकाशन

 

मुंबई, प्रतिनिधी । मुंबईत आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडाच्या कार्यक्रमात मनिषा देवगुणे लिखित “शब्दात गुंतले मी..” या कवितासंग्रह पुस्तकाचे प्रकाशन राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते प्रकाशन झाले.

मुंबई येथे राज्य मध्यवर्ती ग्रंथालय, टाऊन हॉल येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या उदघाटना निमित्त मंत्री सुभाष देसाई आले होते. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा हा दि १४ ते दि २८ जानेवारी दरम्यान राबविण्यात येणार आहे.यावेळी मराठी भाषा संवर्धना संदर्भात उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले हा कार्यक्रमाचे महाराष्ट्राभर थेट प्रेक्षपण देखील करण्यात आले होते.

यावेळी सहायक आयुक्त मनिषा देवगुणे लिखित “शब्दात गुंतले मी..” काव्यसंग्रह पुस्तकाचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले आहे. या पुस्तकामध्ये वाचनीय कविता आहे. या पुस्तकाला चित्रपट गितकार बाबासाहेब सौदागर यांची प्रास्तावना असून महाराष्ट्र साहित्यिक परिषदच्या सचिव चंद्रकांत पालवे यांचे शुभेच्छा संदेश लाभला आहे.

कार्यक्रमाला यांची होती उपस्थिती

या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमाला उद्योग व मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत हे दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते. तर उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव ओ.पी. गुप्ता, मराठी भाषा सचिव प्राजक्ता लवंगारे, मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर, सहायक आयुक्त व पुस्तक लेखिका मनिषा देवगुणे, ग्रंथालय संचालक शालिनी इंगोले, एशियाटिक सोसायटी, मुंबईच्या अध्यक्षा विस्पी बालापोरिया, विनिता पवार, सत्वशिला शिंदे, तहसीलदार, अर्चना शंभरकर माहिती अधिकारी, सुचित्रा देशपांडे मंत्रालयीन वरिष्ठ अधिकारी व दिनेश चंदेल उपनिबंधक सहकारी संस्था डोंबिवली हे उपस्थित होते उपस्थित होते
.

Exit mobile version