Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मनसे जनहित व विधी जिल्हा सहसंघटकपदी राजेंद्र निकम यांची निवड

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित विभाग व विधी विभागाच्या जिल्हा उपसंघटकपदी राजेंद्र निकम यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल सर्वत्र अभीनंदन होत आहे.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख यांनी स्थानिक पातळीवर कार्यकारणी जाहीर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. या अनुषंगाने मनसेच्या जनहित आणि विधी विभाग प्रदेशाध्यक्ष किशोर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक पातळीवर कार्यकारणी जाहीर करण्यात आलेले आहेत. या कार्यकारणी मध्ये जळगाव जिल्हा उपसंघटकपदी राजेंद्र निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुण्यात झालेल्या पक्षाच्या बैठकीत नियुक्ती पत्र देऊन अभिनंदन केलेले आहे तसेच उपशहर संघटक किरण सपकाळे, जळगाव तालुका उपसंघटक विकास पावरा, जळगाव तालुका सचिवपदी किशोर खलसे, विधी विभागाचे शहर सचिवपदी सागर शिपी आदींची निवड करण्यात आली आहे.

Exit mobile version