Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मनसेच्या यावल शहर उपाध्यक्षपदी आबिद कच्छी तर तालुका उपाध्यक्षपदी अनिल सपकाळे

यावल प्रतिनिधी । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या यावल शहराध्यक्षपदी आबिद कच्छी तर उपाध्यक्षपदी अनिल सपकाळे तर तालुका उपाध्यक्षपदी अनिल सपकाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जळगाव येथे झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशान्वये कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मनसेच्या साधन सुविधा व अस्थापना जिल्हा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन विधी व न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्ह्याचे उपाध्यक्ष रावसाहेब कदम व जिल्हा सचिव ॲड. जमील देशपांडे यांच्याहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमा यावल शहराच्या उपाध्यक्षपदी आबिद कच्छी यांची तर तालुका उपाध्यक्षपदी अनिल सपकाळे यांची निवड करण्यात आली आहे. याप्रसंगी रावेर लोकसभा जनहितचे जिल्हाध्यक्ष चेतन अढळकर, जिल्हा उपाध्यक्ष राहूल काळे यांच्यासह आदी मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version