मनवेल विकासोच्या चेअरमनपदी भरत चौधरी बिनविरोध

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील मनवेल येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी भरत धनसिंग चौधरी यांची तर व्हाईस चेअरमनपदी वासुदेव सिताराम पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

मनवेल येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी यावल येथील के.व्ही.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सहकारी सोसायटी संस्थेच्या सभागृहात नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक पार पडली .

चेअरमनपदी भरत धनसिंग चौधरी यांचा चेअरमनपदासाठी एक अर्ज तर व्हाईस चेअरमनपदासाठी वासुदेव सिताराम पाटील यांचा एक अर्ज दाखल झाल्याने निवड बिनविरोध झाल्याचे निवडणुक निर्णय अधिकारी के.व्हि.पाटील यांनी जाहिर केले. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक विनोदकुमार पाटील ,सरपंच परीषदचे यावल तालुकाध्यक्ष व वढोदा सरपंच संदिप सोनवणे , माजी पंचायत समिती सदस्य अरुण आबा पाटील शिरसाड येथील प्रमोद सोनवणे, थोरगव्हाण येथील मुरलीधर चौधरी, मनवेल तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष बबन पाटील, सामाजिक कार्यकर्ता गोविंद पाटील, थोरगव्हाण येथील माजी.सरपंच प्रेमलाल चौधरी, हिरालाल चौधरी, योगराज चौधरी, यांनी नवनिर्वाचित चेअरमण व व्हाईस चेअरमण व संचालक यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

यावेळी नवनिर्वाचित संचालक गयभु चौधरी, कांतिलाल पाटील, धर्मराज पाटील, हुकूमचंद पाटील ,काशिनाथ पाटील, यूवराज पाटील ,रायसिंग भालेराव, हरीभाऊ धिवर, विनोद पाटील ,सौ.योगिता पाटील ,शानूबाई पाटील उपस्थित होते यावेळी विवडणुकीची संपुर्ण प्रक्रीया यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थेचे सचिव सुनिल सुरवाडे ,सुकदेव पाटील यांनी निवडणुक निर्णय अधिकारी के व्ही पाटील यांना विशेष सहकार्य केले.

Protected Content