Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मनवेल येथे महिलेचा विनयभंग; १२ जणांविरूध्द गुन्हा

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील मनवेल गावात महीलेचा गावातील तरुणांनी विनयभंग केल्याची घटना घडली असुन या प्रकरणी यावल पोलीसात बारा जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहीतीनुसार मनवेल तालुका यावल येथील राहणार्‍या एक ३५ वर्षीय महीला ही आपल्या जेठाणी सोबत या दिनांक ८ जुनच्या रात्री ९ वाजेच्या सुमारास मनवेल गावातील सार्वजनिक ठिकाणी शौचास बसली असता संयशीत प्रथमेश सोनवणे , गोकुळ इंधाटे, प्रशिक गुलाब इंधाटे आणी मनोहर प्रकाश इंधाटे यांनी त्या ठिकाणी जावुन फिर्यादी महीला व तिची जेठानी यांच्या तोंडावर मोबाइल बॅटरीचे टॉर्च चमकावुन लज्जा वाटेल असे कृत्य केले. यानंतर फिर्यादीच्या घरासमोर कार्यकारी सोसायटी जवळच्या सार्वजनिक ठिकाणी प्रथमेश सुनिल सोनवणे , गोकुळ इंधाटे, मनोहर प्रकाश इंधाटे, प्रशिक गुलाब इंधाटे, निखिल प्रशांत इंधाटे, दगडु सुरेश भालेराव, विकास बापु इंधाटे, तुषार भगवान इंधाटे, सचिन बाबुराव सोनवणे आणी दोन महीलांनी सार्वजनिक ठिकाणी बेकायद्याशीर मंडळी जमवुन फिर्यादी व तिच्या जेठानीस शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. या अनुषंगाने यावल पोलीसात या सर्व संयशीत आरोपींच्या विरूद्ध विधिध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन या घटनेचा तपास पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी अशोक जवरे हे करीत आहेत.

Exit mobile version