Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मनपा वॉलमनचा कामाच्या ताणातून हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; नातेवाईकांचा आरोप

जळगाव प्रतिनिधी । महापालिकेत वॉलमनचा पाणी सोडत असतांना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. आजारी असतांना महापालिकेच्या अधिकारीने सुट्टी दिली नाही. कामाच्या ताणातून हृदयविकाराचा झटका आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

विष्णू पुंडलिक धांडे (वय-५७) रा. सुनसवाडी ता. भुसावळ ह.मु. तळेले कॉलनी, जुना खेडी रोड असे मयत झालेल्या महापालिका कर्मचाऱ्याचे नाव आहे. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, विष्णू धांडे  हे महापालिकेत पाणीपुरवठा विभागात वालमन म्हणून पाणी सोडण्याचे काम करतात. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या डोळयांवर गेल्या महिन्यात शस्त्रक्रीया करण्यात आलेली होती. त्यामुळे गेल्या २१ सप्टेंबर पर्यंत त्यांना डॉक्टरांनी विश्रांती घेण्यास सांगितले होत. त्याच दरम्यान त्यांना मोठाचा आजार उद्भवला. त्यामुळे विष्णू धांडे यांनी महापालिकेत वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुट्टी मागितली होती. परंतू महापालिकेतील पाणीपुरवठा अभियंता मंजूळ खान, अविनाश कोल्हे आणि बाबा साळुखेयांनी सुट्टी देण्यास टाळाटाळ करत आहे. दरम्यान आज १० ऑक्टोबर रोजी सकाळी शहरातील जुने जळगाव कोल्हे वाडा येथे सुरू केलेला व्हॉल बंद करण्यासाठी गेले असता त्यांचा चक्कर आले आणि हृदय विकाराचा झटका आला आणि जागीच मृत्यू झाला.

डॉक्टरांनी आराम करण्यासाठी सांगितले परंतू महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या अडमुठेपणामुळे त्यांना सुटी दिली नाही. या आजाराच्या ताणातून विष्णू धांडे यांचा मृत्यू झाला असा आरोप जावाई महेश नेमाडे रा. जळगाव यांनी माध्यमांशी बोलतांना केले. मयताच्या पश्चात पत्न जयश्री, मुलगा तेजस आणि विवाहित मुलगी सिमा असा परिवार आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Exit mobile version