Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मनपातर्फे पवननगर परिसराचे निर्जंतुकीकरण; नागरिकांना घरी राहण्याचे महापौरांचे आवाहन

जळगाव, प्रतिनिधी ।  शहरातील पवननगरात एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर महापौर भारती सोनवणे यांनी लागलीच त्याठिकाणी भेट देत संपूर्ण परिसरात लागलीच सॅनिटायझेशन करण्यात आले. दरम्यान, रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांना देखील क्वारंटाइन करण्यात आले आहे. मनपा आयुक्त सतिष कुलकर्णी यांनी परिसर सील करण्याच्या सूचना दिल्या.

पवननगरात नागरिकांना आवाहन करण्यासाठी महापौर सौ.भारती सोनवणे यांनी मनपा आयुक्त सतिष कुलकर्णी यांच्यासह लागलीच परिसराला भेट दिली. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे, नवनाथ दारकुंडे, किशोर बाविस्कर, चेतन सनकत, नगरसचिव सुनील गोराणे, मलेरिया विभागाचे सुधीर सोनवाल, डॉ.राम रावलानी, डॉ.संजय पाटील, डॉ.विजय घोलप, आबा बाविस्कर, शनीपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक विठ्ठल ससे व कर्मचारी आदी उपस्थित होते.

परिसर केले सॅनिटायझेशन
रुग्ण आढळून येताच महापौर सौ.भारती सोनवणे यांनी परिसरात तात्काळ सॅनिटायझेशन करण्याच्या सूचना दिल्या. रुग्णाच्या घरासह परिसरात मलेरिया विभागाकडून स्प्रिंकलर मशीनद्वारे फवारणी करण्यात आली.

परिसर सील करण्याच्या सूचना
पवन नगर परिसर रुग्ण आढळून आल्याने परिसर सील करण्याच्या सूचना महापौर भारती सोनवणे यांनी दिल्या. यावेळी सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांच्यासह शनीपेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version