Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मनपाची धडक कारवाई : १८ दुकानांना लावले सील (व्हिडिओ)

 

जळगाव, प्रतिनिधी । शहरात कोरोना प्रतिबंध नियम मोडणाऱ्या १८ दुकानांना सील करण्याची कारवाई महापालिकेच्या पथकाद्वारे उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली  करण्यात आली. 

कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. मात्र, नागरिक कोरोना संसर्ग वाढत असतांना नियमांचे सर्रास उल्लंघन करत असल्याचे दिसून येत आहेत. यात काही दुकानदार ग्राहकांची गर्दी जमवून व्यवसाय करीत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस येत आहेत. अशाच प्रकारे दुकानाचे शटर बंद करून व्यवसाय करणारे जवळपास १८ दुकानांना सील करण्यात आलेत.

बळीराम पेठेतील पुष्पा कलेक्शनमध्ये महिलांनी खरेदीसाठी गर्दी केल्याचा प्रकार मनपा पथकासमोर उघड झाला.  आज नॅशनल प्लास्टिक स्टोअर्स, राजस्थान वेल्डिंग वर्क्स (कोंबडी बाजार चौक),  न्यू बी. जे. मार्केटमधील श्री राज आटो, सॅनोरीटा  इलेक्ट्रिकल्स, महाराष्ट्र पेंट हाऊस, वेद प्रिंट्स ऑफसेट, शाह इंजिनीअरिंग वर्क्स, सुनील अर्जुन पाटील हे दुकाने सील करण्यात आली. बोहरा गल्लीत अनंत हेअर आर्ट्स, आकाश शूज सेंटर (दौलत प्लाझा, टावर चौक),  पुष्पा कलेक्शन (बळीराम पेठ), महात्मा फुले मार्केट मधील जगदीश होजीअरी, मेट्रो ड्रेसेस, राधिका ड्रेसेस, विशाल युनिफॉर्म व शाहू नगर हौसिंग सोसायटी मधील दीपक प्लाय अॅन्ड  किचन व निसरा प्रहार प्रेसला सील लावण्यात आले.

 

 

Exit mobile version