मध्य रेल्वे मार्गावरील उड्डाणपुलाची डागडुजी (व्हिडिओ)

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातून जाणार्‍या महामार्गावरील शिवकॉलनी रेल्वे उड्डाण पुलाची आज डागडुजी करण्यात येत आहे. रेल्वे उड्डाणपूलाच्या आतील भागाचे दुरुस्तीचे कार्य एका तासात हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.

 

जळगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील पिंप्राळा परिसरात असलेल्या शिवकॉलनी रेल्वे उड्डाण पुलाच्या दुरुस्तीचे काम रेल्वे प्रशासनाकडून हाती घेण्यात आले. शनिवारी सकाळी १०.३० वाजेपासून ही दुरूस्ती क्रेनच्या मदतीने करण्यात येत आहे. याला जवळपास एक तासाचा कालावधी लागणार आहे. या दुरूस्तीसाठी मध्य रेल्वे प्रशासनाकडून मुंबईकडून येणाऱ्या डाऊन मारागावरील येणारी वाहतूक तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. साधारणपणे एक ते दीड तासात हे काम पूर्ण होणार असून डाऊन मार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासन सूत्रांनी सांगतिले. पुलाचे खालील भागातील प्लास्टर निघालेले असल्याने त्याची दुरुस्ती तातडीने करण्यात येत असल्याची माहिती कनिष्ठ अभियंता ओम साई यांनी लाईव्ह ट्रेंड्स न्यूजशी बोलतांना सांगितले.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/947738319233753

 

Protected Content