Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मध्य रेल्वेची विनातिकीट अनियमित प्रवासाविरुद्ध तिकीट तपासणीमोहीम तीव्र

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी – गेल्या दोन वर्षापासून संसर्ग प्रादुर्भावामुळे मध्य तसेच पश्चिम रेल्वेमार्गावर विशेष प्रवासी रेल्वे चालविल्या जात आहेत. यात सर्वसाधारण मासिक पास सेवा पॅसेंजरपास वगळता कोठेही देण्यात आलेली नाही. गेल्या एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ दरम्यान विनातिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाकडून नियमितपणे उपनगरीय, मेल, एक्स्प्रेस, प्रवासी आणि विशेष गाड्यांमध्ये विनातिकीट आणि अनियमित प्रवासाविरुद्ध तीव्र तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. या तिकीट तपासणीतून मध्य रेल्वेला रु. २०० कोटी महसूल प्राप्त झाला असल्याची माहिती भुसावळ मध्य रेल्वे प्रशासनाने दिली.

भारतीय रेल्वेवरील सर्वच झोनमध्ये सर्वाधिक बोनाफाईड रेल्वे प्रवाशांना उत्तम सेवेसाठी तसेच विनातिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेने नियमितपणे उपनगरीय, मेल, एक्स्प्रेस, प्रवासी आणि विशेष गाड्यांमध्ये महसुलाची गळती रोखण्यासाठी मध्य रेल्वेचे दक्षता पथक तिकीट तपासणी कर्मचार्‍यांसह विनातिकीट आणि अनियमित प्रवासाविरुद्ध विशेष तिकीट तपासणी मोहीम तीव्रपणे राबविण्यात आली.

भुसावळ विभागात विनातिकीट ८.१५ लाख नागरिकाकडून ५८.७५ कोटी दंड वसूल 
या तिकीट तपासणीद्वारे मध्य रेल्वेला २०० कोटी रुपयांचा महसूल मिळाला. १.एप्रिल २०२१ ते १६ मार्च २०२२ दरम्यान कालावधीत ३३ कोटी ३० लाख नागरिक विनातिकीट प्रवास करताना आढळून आले. मुंबई विभागात विनातिकीट आणि अनियमित प्रवासाची १२.९३ लाख नागरिकांकडून ६६.८४ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला. भुसावळ विभागात विनातिकीट प्रवास करणारे ८.१५ लाख प्रकरणातून ५८.७५ कोटी तर नागपूर विभागात ५.०३ लाख नागरिकांकडून ३३.३२ कोटी, सोलापूर विभागात ३.३६ लाख विनातिकीट प्रवाशांकडून १९.४२ कोटी, पुणे विभागात २.०५ लाख विनातिकीट प्रवाशांकडून १०.०५ कोटी आणि मुख्यालयाच्या तिकीट तपासणी पथकांनी विनातिकीट आणि अनियमित प्रवासाची १.८० लाख नागरिकाकडून १२.४७ कोटी रुपये दंडात्मक वसूल करण्यात आले.

संसर्ग प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन ; ५६,४४३ व्यक्तींकडून ८८.७८ लाख रुपये दंड
व्यतिरिक्त या कालावधीत सर्व ५६,४४३ व्यक्ती कोविड योग्य वर्तनाचे उल्लंघन केल्याबद्दल आणि मास्क न परिधान केल्याबद्दल आढळून आले आणि त्यांच्याकडून ८८.७८ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. गैरसोय टाळण्यासाठी आणि सन्मानाने प्रवास करण्यासाठी तसेच स्वतः च्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी संसर्ग प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्यासह विनातिकीट प्रवासासह दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी प्रवाशांनी योग्य तिकिटे घेऊनच प्रवास करावा असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले असल्याचे जनसंपर्क अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये म्हटले आहे.

 

Exit mobile version