Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मध्य प्रदेश विधानसभेच्या हंगामी अध्यक्षांकडून ममता बॅनर्जींना रामायणाची प्रत भेट

 

भोपाळ : वृत्तसंस्था । मध्यप्रदेश विधानसभेचे हंगामी अध्यक्ष आमदार रामेश्वर शर्मा यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना रामायणाची एक प्रत पाठवली आहे.

शर्मा यांनी म्हटले आहे की, “पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना रामायणाची प्रत पाठवली आहे. अपेक्षा आहे की, ममता दीदी रामायणाचे वाचन करतील, प्रभू श्रीरामाचे चरित्र समजतील आणि इथून पुढे जय श्रीरामच्या घोषणांचा विरोध करणार नाहीत.”

राम नामाच्या जय घोषाने ममता बॅनर्जी यांना राग येतो. “ममता दीदींना माझी प्रार्थना आहे, जय श्रीराम म्हणणं त्यांनी देखील शिकावं. प्रभू श्रीरामाचा विरोध करणं बंद करा. पश्चिम बंगालमधील एका कार्यक्रमा दरम्यान तुम्ही प्रभू श्रीरामाचा अपमान केला आहे, बंगालची जनता विधानसभा निवडणुकीत तुम्हाला धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही. अयोध्येत इतक्या वर्षांनंतर प्रभू श्रीरामाचे मंदिर बनत असतानाही, ममता बॅनर्जी नाराज आहेत.” असं देखील शर्मा यांनी बोलून दाखवलं आहे.

काल शनिवार कोलकातामध्ये पंतप्रधान मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भाषणा अगोदर उपस्थितांनी जय श्रीराम अशा घोषणा दिल्याने, ममता बॅनर्जी प्रचंड चिडल्याचे दिसून आले. एवढेच नाहीतर त्यांनी याबाबत उघडपणे नाराजी व्यक्त करत, भाषण करण्यासही नकार दिला होता.

Exit mobile version