Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये भीषण आग ; एकाच कुटुंबातील ६ जणांचा होरपळून मृत्यू

ग्वाल्हेर (प्रतिनिधी) मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरच्या इंदरगंजमध्ये एका घराला भीषण आगल्यामुळे तब्बल ६ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.

 

 

एका घरात अचानक आग लागली तेव्हा लॉकडाऊनमुळे सगळेजण घरात होते. आगीची तीव्रता जास्त असल्यामुळे यामध्ये 3 मुले आणि 3 महिलांचा होरपळून मृत्यू झाला. घराला आग लागल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात येताच तात्काळ अग्निशमन दलाला प्राचारण करण्यात आले. प्रशासनाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले तोपर्यंत कुटुंबातील सहा जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला होता.

Exit mobile version