Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मध्यरात्री घरातून रोख रकमेसह मुद्देमाल लांबविला

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर शहरातील आयटीआय कॉलनी भागात मध्यरात्री एका घरातून रोख रकमेसह मोबाईल आणि घड्याळ असा एकूण २३ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर सोमवारी १५ मे रोजी दुपारी १ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रमेश मोतीराम ब्राह्मणे (वय 63 रा. आयटीआय कॉलनी, जामनेर) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. ११ मे रोजी रात्री १० ते १२ मे रोजी सकाळी ४ वाजेच्या दरम्यान घरात सर्वजण झोपलेले असताना अज्ञात चोरट्याने घरात शिरून त्यांच्या घरातून रोख रकमेसह मोबाईल, चार्जर आणि घड्याळ असा एकूण २३ हजार ४०० किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी रमेश ब्राह्मणे यांनी जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक मुकेश आमोदकर करीत आहे.

Exit mobile version